हायड्रोजन :

Posted by editor on
0
Information

हायड्रोजन :

अणुअंक – १
गण – १
आवर्तन – १
चिन्ह – H
स्वरूप – द्वीअणु अधातू
गट (BlockBlock) – SS गट (SS BlockBlock)
बाह्यत्तम कक्षेतील इलेक्ट्रॉन – १
रंग – रंगहीन मुलद्रव्य
स्थिती(सामान्य तापमानाला) – वायू अवस्था
द्रवणांक – १३.९९ केल्विन (-२५९.१६° से.)
उत्कलनांक – २०.२७१ केल्विन(-२५२.८७° से.)
घनता – ०.०८९८ ग्रॅम/ली.
त्रिज्या(सहकारिता) – ३१ पी.मी.
त्रिज्या(वांडर वाल्स) – १२० पी.मी.
भूमितीय संरचना – षटकोनी
शोध – १७६६(हेनरी कॅव्हेंडिश)
नामकरण – १७८३(अँटोनी लवायझर)
हायड्रोजन हे आधुनिक आवर्तसारणीतील प्रथम क्रमांकाचे व वजनाने सर्वात हलके मुलद्रव्य म्हणून ओळखले जाते. हायड्रोजन आपल्या वातावरणात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. हायड्रोजन या मुल्द्रव्याला एक प्रोटॉन आहे तर न्यूट्रॉन्सची संख्या शून्य आहे. हायड्रोजन मुलद्रव्य रंगहीन, वासहीन, चवहीन, अविषारी, अधातू व अत्यंत ज्वलनशील वायू अशी याची ओळख आहे.

इतिहास:

हायड्रोजन हे मुलद्रव्य प्रथमतः कृत्रिमपणे प्रयोगशाळेत १६ व्या शतकात बनवला गेला. लोह धातूची जेव्हा आम्लाशी किंवा पाण्याशी अभिक्रिया केली जाते तेव्हा हायड्रोजन तयार होतो. इसवी सन १७६६-१७८१ या काळात हेनरी कॅव्हेंडिशने प्रथम त्याचे गुणधर्म ओळखले. हायड्रोजनचे ज्यावेळी ज्वलन होते त्यावेळी त्याच्यातून पाण्याची निर्मिती होते हे त्याने ओळखले होते. ग्रीक शब्द हायड्रोजन पासून आजचे हायड्रोजन मुलद्रव्य बनले आहे. ग्रीक भाषेत हायड्रोजन शब्दाचा अर्थ हायड्रो म्हणजे पाणी व जीन्स(genes) म्हणजे तयार करणारा थोडक्यात ‘पाणी तयार करणारा’ असा होतो.

उपयोग:

१) पेट्रोलियम आणि रासायनिक कारखान्यात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
२) जीवाश्म इंधन तयार करण्यासाठी याचा वापर होतो.
३) अमोनिया, मिथेनोल तयार करण्यासाठी.
४) वेल्डिंग करण्यासाठी याचा वापर होतो.
५) हे मुलद्रव्य हवेपेक्षा हलके असल्याने याचा पॅराशूट (हवेत उडणारे मोठे फुगे) मध्येही उपयोग केला जातो.
6) मोठमोठ्या ऊर्जा प्रकल्पात इंजिनला थंड ठेवण्यासाठी ‘कुलंट’ म्हणून याचा वापर होतो.
7) हायड्रोजन हे प्रदूषण न पसरवणारे इंधन आहे म्हणून याचा वापर करून अनेक वाहने तयार केली जात आहेत.

© टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे . www.technoexam.com
MPSC च्या लेटेस्ट अपडेट्स साठी आपण टेक्नोएक्झाम चे अधिकृत चॅनेल्स जॉईन करू शकता: WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/aEnjH2 या लिंकवर जाऊन रजिस्टर करा .
आमचा क्रमांक +91-8657194194 असा सेव्ह आहे का हे तपासून पहा. नसल्यास क्रमांकाच्या आधी +91 जोडा .

सोफिया : तंत्रज्ञान जगतातील पुढचे पाऊल

Posted by editor on
0
Information

सोफिया : तंत्रज्ञान जगतातील पुढचे पाऊल

हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीने १९ एप्रिल २०१५ रोजी एक रोबोट सक्रीय केला आणि मार्च २०१६ ला साउथ बाय साउथवेस्ट फेस्टिवलमध्ये (जे ऑस्टिन, टेक्सास, अमेरिका येथे भरते) प्रथमतः लोकांसमोर सादर केला गेला. डेविड हॅन्सन यांनी आपल्या ‘हॅन्सन रोबोटिक्स’ या कंपनीत ‘ए.आई. डेव्हलपर्स’ आणि ‘अल्फाबेट’ या कंपन्यांसोबत मिळून हा रोबोट तयार केला आहे. अल्फाबेट ह्या कंपनीने(जी गुगल ची पालक कंपनी म्हणून ओळखली जाते) या रोबोटला आवाज ओळखण्याची क्षमता (Voice Recognition System) विकसित करून दिली आहे. सोफिया असे रोबोटचे नाव आहे.

वैशिष्ट्ये :

तुम्ही म्हणाल या रोबोटमध्ये असे काय खास? तर ही रोबोट आपल्या चेहऱ्यावरील ६२ प्रकारचे चेहरा अभिव्यक्ती (Facial Expression) अचूक प्रकारे ओळखते. डोळ्यांच्या हालचालीसुद्धा अचूक ओळखते. त्याचबरोबर आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवू शकते, वातावरणविषयक अचूक भाकीत करू शकते. कोणाही सामान्य व्यक्तीप्रमाणे ती आपल्यासोबत बोलूही शकते. इथेच सोफियाची वैशिष्ट्ये संपत नाहीत तर ऑक्टोबर २०१७ मध्ये सौदी अरेबियाने सोफियाला आपल्या देशाचे नागरीकत्वही बहाल केले आहे. रोबोटला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. सोफिया कृत्रिम बुद्धीमत्ता तत्वावर कार्य करते. नोव्हेंबर २०१७ मध्ये युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे पहिले सर्वोत्कृष्ट संशोधन म्हणून नावाजले गेले. याच महिन्यात सोफियाने एका प्रेस कॉन्फरन्सला देखील हजेरी लावली होती. जानेवारी २०१८ मध्ये सोफियाचा पायांच्या सॉफ्टवेअर मध्ये बदल करून तिला अद्ययावत केले आहे. सोफिया तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक पुढचे प्रगत पाऊल आहे. पुढे कुठे विमानतळावर, रेल्वेस्थानकावर किंवा टीव्हीवर बातम्या देताना जर रोबोट दिसला तर नवल नको वाटायला..!

© टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे. www.technoexam.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील अधिक नवनवीन माहितीसाठी : WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/X8bvqz या लिंकवर जाऊन रजिस्टर करा.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाने पूर्ण केले ७००० दिवस

Posted by editor on
0
Uncategorized

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाने पूर्ण केले ७००० दिवस:-

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन(ISS) म्हणजे अंतराळातील मानवरहित पृथ्वीच्या अभ्यासासाठी असलेली प्रयोगशाळा होय. अंतराळ स्थानकाचे तपशील पुढीलप्रमाणे:-
वजन – ४,१९,४५५ कि.ग्रॅ.
लांबी – ७२.८ मी.(२३९ फुट)
जाडी – १०८.५ मी.(३५६ फुट)
उंची – २० मी.(६६ फुट)
दबावाचे घनफळ – ९३१.५७ घनमी.(३२,८९८ घनफूट)
वातावरणीय दबाव – १०१.३ किलो पास्कल
पृथ्वीपासून निकटतम बिंदू(piregee) – ४०१.१ किमी.(२४९.२ मैल)
पृथ्वीपासून दूरचा बिंदू(Apogee) – ४०८ किमी.(२५३.५ मैल)
कक्षीय अंश – ५१.६४°
कक्षीय वेग – ७.६७ किमी/से.(२७,६०० किमी./तास)
दिवसाच्या एकूण कक्षा – १५.५४

ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे २० नोव्हेंबर १९९८ साली प्रथमतः प्रक्षेपण करण्यात आले. या अंतराळ स्थानकाची लोकांची क्षमता ६ आहे. दिनांक १९ जानेवारी २०१८ रोजी या स्थानकाने ७,००० दिवस पूर्ण केले.

© टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे. www.technoexam.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील अधिक नवनवीन माहितीसाठी : WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/X8bvqz या लिंकवर जाऊन रजिस्टर करा.

अल्फा-हायड्रोजनवर चालणारी सायकल:

Posted by editor on
0
Information

अल्फा-हायड्रोजनवर चालणारी सायकल:

सायकल चालवणे तसे शरीराच्या तंदुस्तीसाठी चांगले मानले जाते पण आजकालच्या धावत्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात सायकल चालवायला वेळ कुणाकडे आहे? आणि याला जबाबदार जेवढे आपण आहोत तेवढेच तंत्रज्ञान देखील आहे. विज्ञानाच्या प्रगतीवर आपण विसंबून राहत आहोत. यातच भर टाकली आहे ती एका फ्रेंच कंपनीने. या कंपनीने सायकल चालवणे म्हणजे कंटाळवाणे आणि कष्टाचे काम ही व्याख्याच बदलून टाकली आहे.

“प्रॅग्मा इंडस्ट्रीज” या फ्रेंच कंपनीने जगातील पहिली अशी सायकल तयार केली आहे जी कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता, एकही पॅडल न मारता आपल्याला सैर घडवून आणू शकते. हायड्रोजन इंधनाचा वापर करून ही सायकल चालते. ही सायकल दोन लिटर हायड्रोजन इंधन वापरून सुमारे १०० किमी.चे अंतर कापू शकते. ही सायकल विद्युत सायकलीसारखीच(Electric Cycle) असली तरी त्या सायकलीमध्ये व या सायकली मध्ये खुपसा फरक आहे. विद्युत सायकली चार्ज होण्यास काही तास घालवतात, पण ही सायकल केवळ २ मिनिटात चार्ज होते (सायकल वापरून वेळेचा सदुपयोग ! ). हे शक्य आहे कारण १ किलो हायड्रोजन हे १ किलो लिथियम बॅटरीपेक्षा ६०० पट अधिक चालते. या सायकलीची सर्वोत्तम गती २५ किमी./तास एवढी आहे.

अल्फा असे या सायकलचे नामकरण करण्यात आले आहे. आता या सायकलीची साधारण किंमत ७,५०० युरो(जवळपास ६ लाख रुपये) एवढी असणार आहे. कंपनी ही किंमत ५००० युरो(४ लाख रुपये)पर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. नॉर्वे, अमेरिका, स्पेन, इटली आणि जर्मनी या देशांनी ही सायकल घेण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. ग्राहकाला सतत इंधन भरण्यासाठी वेळ लागू नये म्हणून तिकडे कंपनी अशी सायकल तयार करत आहे जी पाण्याचे रुपांतर हायड्रोजन मध्ये करू शकेल. ही सायकल निर्विवादपणे पर्यावरणाचा समतोल राखून आपला वेळ वाचवते पण त्यासाठी आपला खिसा देखील भारी असला पाहिजे…..!

© टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे. www.technoexam.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील अधिक नवनवीन माहितीसाठी : WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/X8bvqz या लिंकवर जाऊन रजिस्टर करा.

गुरु ग्रह (सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह)

Posted by editor on
0
Information

गुरु ग्रह (सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह)

सूर्यापासूनचे अंतर : ७७८५ x १०^६ किमी.

सूर्यापासून क्रमांक (अंतराने) : पाचवा

संरचना : ८९% हायड्रोजन, १०%हेलियम, ०.३% मिथेन, ०.०२६% अमोनिया, ०.००२८% हायड्रोजन ड्यूटेराईड, ०.०००६%इथेन, ०.०००४% पाणी. बर्फ-अमोनिया, पाणी, अमोनियम हायड्रोसल्फाईड

त्रिज्या : विषुववृत्तीय त्रिज्या-७१,४९२ कि.मी.(पृथ्वीच्या ११.२०९ पट), ध्रुवीय त्रिज्या – ६६,८५४(पृथ्वीच्या १०.५१७ पट)

व्यास : १,४२,९८४ कि.मी.

वजन : १.८९८६ x १०^२७ किलोग्रॅम

घनता : १,३२६ कि.ग्रॅ/घनमी.

आकारमान : सर्वात मोठा

अपसूर्य बिंदू : ८१,६५,२०,८०० किमी. (५.४५८१०४ खगोलीय एकक)

उपसूर्य बिंदू : ७४,०५,७३,६०० किमी. (४.९५०४२९ खगोलीय एकक)

परिभ्रमण काळ : ४,३३१.५७ दिवस (११.८५९२वर्ष)

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ : ६.२१७९६ x १०^१० चौरस किमी (पृथ्वीच्या १२१.९ पट)

घनफळ : १.४३१२ x १०^१५ घन किमी (पृथ्वीच्या १३२१.३ पट)

पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण : २४.७९ मी./से.२

सरासरी कक्षीय वेग : १३.०७ कि.मी./से.

पृष्ठभागावरील सरासरी तापमान : १०८ °से.

कक्षेचा कल : १.३०५°

पृष्ठभागावरील दाब : २० ते २०० किलोपास्कल

उपग्रह : ६९ (पैकी ४ चंद्रांचा शोध गॅलिलिओ लावला आहे)

गाभा: कमी खडकाळ पण कठीण

पृष्ठभागाचे आकार :विषुववृत्ताजवळ थोडासा फुगीर

इतर नावे : जोव्हियन ग्रह, राक्षसी वायू ग्रह, रोमन देव ‘ज्युपिटर’ याच्यावरून या ग्रहाला ज्युपिटर हे नाव देण्यात आले आहे.

© टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे. www.technoexam.com
MPSC च्या लेटेस्ट अपडेट्स साठी आपण टेक्नोएक्झाम चे अधिकृत चॅनेल्स जॉईन करू शकता: WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/aEnjH2 या लिंकवर जाऊन रजिस्टर करा.
आमचा क्रमांक +91-8657194194 असा सेव्ह आहे का हे तपासून पहा. नसल्यास क्रमांकाच्या आधी +91 जोडा .

MRI मशीनच्या आसपास या ‘५’ चूका टाळाच !

Posted by editor on
0
Information

MRI मशीनच्या आसपास या ‘५’ चूका टाळाच !

काही दिवसांपूर्वी MRI मशीनमध्ये खेचला गेल्याने नायर हॉस्पिटलमध्ये एका तरूणाचा बळी गेला. बहिणीच्या सासूला भेटायला गेलेल्या या तरूणासोबत असं काय घडलं हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला असेल. म्हणूनच रूग्णालयात कोणत्याही मेडिकल टेस्ट किंवा इतर रूग्णांना भेटायला जाताना काळजी घ्या.

MRI म्हणजे काय ?

MRI म्हणजेच magnetic resonance imaging. या मशीनच्या मदतीने शरीराच्या आतील भागांचे खास पद्धतीने फोटो काढले जातात. या फोटोंच्या मदतीने डॉक्टरांना शरीरात नेमक्या कोणत्या जागी समस्या वाढतेय याची अचूक माहिती मिळते. त्यानुसार पुढील उपचार ठरवले जातात.
MRI मशीनच्या आसपास इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड असते. यामध्ये पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण क्षमतेपेक्षा 20-40 हजार पट अधिक वेगाने वस्तू खेचली जाते. म्हणूनच दृश्य-अदृश्य स्वरूपातही कोणत्याही प्रकारे MRI मशीन सुरू असलेल्या खोलीत धातूच्या वस्तू नसाव्यात याची काळजी घ्यावी लागते.

MRI मशीन असलेल्या / टेस्ट करताना कोणत्या गोष्टी हमखास टाळाव्यात ?

१. दागिने : शरीरावर कोणत्याही प्रकारचे दागिने नसावेत. टेस्टपूर्वी सारे दागिने काढून ठेवा. हेअर क्लिप्स, अंगठ्या टाळा.

२. सुती कपडे : MRI साठी जाताना कपड्याची निवडही काळजीपूर्वक करावी. सुती कपड्याची निवड करा. काही डेनिम, जिन्स किंवा इतर कोणत्याही कपड्यावरही बटणं असू शकतात. त्यातील धातूचा घटक धोकादायक ठरू शकतो.

३. मेकअप : मेकअपमध्येही काही प्रमाणात धातूंचा समावेश असतो. त्यामुळे MRIकरताना तसेच तुम्ही MRI करण्यासाठीदेखील रूग्णाला साथ देणार असाल तरीही मेकअप करणं टाळा.
स्किन टिंन्ट्स, नेलपॉलिश, मस्कारा, आयशॅडो, ब्लश, लिपस्टिक टाळा.

४. टॅटू : टॅटू इंकमध्येही आयर्न ऑक्साईड घटक असतात. मॅग्नेटिक फिल्ड या घटकांना देखील खेचून घेऊ शकते. त्यामुळे ब्लॅक पिगमेंट्स किंवा आयर्न ऑक्साईडमुळे धोका वाढू शकतो. टॅटू गोंदवलेल्याअ लोकांनी पूर्व परवानगीनेच MRI खोलीत प्रवेश करताना त्याची माहिती संबंधितांना देणं गरजेचे आहे.

५. मेडिकल डिव्हाईस : ज्या रुग्णांना पेसमेकर, मेटॅलिक स्पाईनल रॉड्स, मेटॅलिक प्लेट्स, स्क्रु, ब्रेसेस लावलेल्या रूग्णांना MRIरूममध्ये प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास
त्या वस्तू काढून ठेवाव्या लागतात. पेसमेकरसारखी जी मेडिकल डिव्हाईस काढली जाऊ शकत नाहीत अशा रूग्णांबाबत मात्र डॉक्टरांना इतर काही पर्यायांचा वापर करावा लागतो.

विशेष लेखन आणि आभार : http://zeenews.india.com

© टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे. www.technoexam.com
MPSC च्या लेटेस्ट अपडेट्स साठी आपण टेक्नोएक्झाम चे अधिकृत चॅनेल्स जॉईन करू शकता: WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/aEnjH2 या लिंकवर जाऊन रजिस्टर करा.
आमचा क्रमांक +91-8657194194 असा सेव्ह आहे का हे तपासून पहा. नसल्यास क्रमांकाच्या आधी +91 जोडा

भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला कल्पना चावला

Posted by editor on
0
Person

भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला कल्पना चावला यांची पुण्यतिथी (१७ मार्च १९६२ – १ फेब्रुवारी २००३)

बालपण :

कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीपला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेरच्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या.

शिक्षण :

कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बालनिकेतन विद्यालयात झाले. कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. शिक्षकांच्या ही त्या लाडक्या झाल्या होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या. भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले. संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकाऱ्यांनी कल्पना स्त्री आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन, त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.

विवाह :

शैक्षणिक काळात कल्पना यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून कल्पना यांना विमान शिकता आले. तसेच स्कूबा डायव्हिंग हा रोमांचक खेळ प्रकारही त्यांना जेपी यांच्याकडून शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच होते. त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले व १९८४ साली जेपी व कल्पना यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले. त्यांची संगीतातील आवड वाढू लागली.

कार्य :

डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.

मृत्यू:

१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्‍या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कराडचे कल्पना चावला विज्ञान केंद्र :

कल्पना चावला यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कराडच्या टिळक हायस्कूलमधील संजय पुजारी नावाच्या विज्ञान शिक्षकांनी कल्पना चावलांच्या वडिलांच्या, बनारसीलाल चावला यांच्या परवानगीने कराडमध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र मुलांमध्ये विज्ञानाचा प्रसार करून त्यांना विज्ञानाची गोडी लावण्याचे कार्य करते. मुलाला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे त्याला प्रत्यक्ष कृतीमधून शोधता आली पाहिजेत, विज्ञानाच्या निकषांवर त्याला विचार करता यायला पाहिजे, प्रयोग करता आले पाहिजेत, अशी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून उभे केलेले हे ’कल्पना चावला विज्ञान केंद्र’, संजय पुजारी यांनी १ जुलै २००६ या दिवशी स्थापन केले. कल्पना चावला विज्ञाना केंद्राचे कार्य कसे चालते, हे पाहण्यासाठी कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला यांनी केंद्राला भेट दिली होती. त्‍यांनी केंद्राचे काम पाहून मोठी देणगीसुद्धा दिली. कल्पना चावला यांच्या भगिनी सुनीतादीदी यांनीही ५० हजार रुपये किमतीची पुस्तके या केंद्रासाठी दिली. भारतात या नावाचे हे एकमेव केंद्र असेल अशी ग्वाही बनारसीलाल यांनी दिली. या विज्ञान केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञानाच्या विविध मूलभूत शाखा यांविषयीची अनेक पुस्तके, विश्वकोश, चरित्रे, विज्ञानाशी संबंधित सीडी आणि डीव्हीडी असा मोठा संग्रह मुलांना संदर्भासाठी उपलब्ध करून दिला जातो. ‘शाळेबाहेरची शाळा’ असे या केंद्राच्या कार्याचे स्वरूप आहे. हसतखेळत आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानाचे शिक्षण देणे हे कल्पना चावला विज्ञान केंद्राचे धोरण आहे. या दृष्टीने केंद्राचे समन्वयक म्हणून काम करणारे पुजारी सर आणि त्यांना मदत करणारे त्यांचे इतर शिक्षक सहकारी सतत प्रयत्‍नशील असतात.

© टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे . www.technoexam.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील अधिक नवनवीन माहितीसाठी : WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/X8bvqz या लिंकवर जाऊन रजिस्टर करा
आमचा क्रमांक +91-8657194194 असा सेव्ह आहे का हे तपासून पहा. नसल्यास क्रमांकाच्या आधी +91 जोडा .

अँपलच्या ‘लिसा’ या संगणकाला आज ३५ वर्षे पूर्ण

Posted by editor on
0
Information

:: अँपलच्या ‘लिसा’ या संगणकाला आज ३५ वर्षे पूर्ण ::

अँपलच्या ‘लिसा’ या संगणकाला आज ३५ वर्षे पूर्ण झालीत. अँपलचा हा पहिला ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI) असणारा व्यावसायिक संगणक. या संगणकाचं निर्माण करण्याचं काम अँपलने १९७८ मध्ये हाती घेतलं. १९ जानेवारी १९८३ ला हा संगणक बाजारात आणला गेला. १ MB रॅम, ५ MB हार्ड डिस्क, Motorola ६८००० @ ५ MHz चा प्रोसेसर, लिसा ऑपरेटिंग सिस्टिम ही प्रमुख तांत्रिक वैशिष्टये. त्यावेळी हा संगणक जवळपास १०,००० अमेरिकी डॉलर्स म्हणजेच आजचे २४,६०० अमेरिकी डॉलर्स (१५,६८,५९४ रु.) एवढ्या भारदस्त किमतीला विकला गेला. एकूण १,००,००० मॉडेल्स विकले गेले. अँपलच्या दृष्टीने हे मॉडेल फ्लॉप गेले. ऑगस्ट १९८६ पासून याचे उत्पादन थांबवलं गेलं.
TechnoExam – For latest updates in Computer Science & Technology join us on WHATSAPP : https://goo.gl/PNK1k5

सुपर, ब्ल्यू, ब्लड मून

Posted by editor on
0
Information

🌍सुपर, ब्ल्यू, ब्लड मून🌎
खगोलीय अविष्कार आणि शास्त्रीय संकल्पनांचा तिहेरी योगायोग. सुपर-ब्ल्यू-ब्लड मून अर्थात खग्रास चंद्रग्रहणाचा मनोहारी, देखणा नजारा आपणांस पाहायला मिळेल. अर्ध्याअधिक पृथ्वीवासीयांना बुधवारी ही संधी लाभणार आहे.

३१ जानेवारीला सुर्यास्तानंतर पूर्व क्षितीजावर चंद्रोदय होईल तो नेहमीपेक्षा आगळा-वेगळा आणि प्रेक्षणीय असणार आहे. खग्रास अवस्थेतील लालसर-तपकिरी रंगाचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचे दिसेल. हा चंद्रोदय न्याहाळणे ही एक नयनरम्य सुखद पर्वणीच असेल.

ग्रहणाबद्दलच्या जुन्या, कालबहाय्य, गैरसमजुतींना बळी न पडता सर्वांनी अशा अलौकिक घटनांचा मनसोक्त आनंद लुटावा आणि त्यामागील निसर्ग विज्ञानही समजून घ्यावे. हे ग्रहण आपण केवळ डोळ्यांनी नेहमी चंद्र पाहतो तसे, कोणत्याही उपकरणाशिवाय पहावे, पाहणाऱ्याला कसलाही धोका किंवा त्रास होणार नाही. मात्र अवर्णनीय आनंदाची अनुभूती जरूर मिळेल.

या आविष्काराचे वेगळेपण असे की, यादिवशी चंद्र त्याच्या भ्रमण कक्षेवरील पृथ्वीपासून जवळच्या बिंदुवर (perigee) असतांना ही पौर्णिमा घडत आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्याजवळ (3,58,995 km) अंतरावर असलेने त्याचे बिंब इतर पौर्णिमांच्या चंद्रापेक्षा थोडे मोठे (14-16%) दिसते, म्हणून या रात्रीच्या चंद्राला ‘सुपरमून’ असे म्हणतात. तसेच जानेवारी या एकाच महिन्यातील ही दुसरी पौर्णिमा असलेने त्या दिवशीच्या चंद्राला ‘ब्ल्यूमून’ असेही म्हणतात. याचा अर्थ चंद्र निळा दिसेल असा होत नाही, ब्ल्यूमून ही केवळ संकल्पना आहे. याशिवाय या दिवशी चंद्रोदयापूर्वीच त्यास खग्रास ग्रहण लागलेले असलेने लालसर-तपकिरी रंगाचे चंद्रबिंब क्षितिजापलीकडून वर येताना दिसेल. खग्रास अवस्थेतील तपकिरी रंगाच्या बिंबास ब्लड/रेड मून असे म्हणतात. खग्रास चंद्र ग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र झाकला जातो पण पृथ्वीभोवतालच्या वातावरणामुळे प्रकाशाचे अपवर्तन होऊन सूर्याचा काही प्रकाश चंद्रावर पोहोचतोच(infrared) त्यामुळे चंद्र तपकिरी रंगाचा दिसु लागतो. असा हा सुपर-ब्ल्यू-ब्लडमूनचा तिहेरी योग खग्रास चंद्रग्रहनाच्या निमित्ताने घडून येत आहे.

या ग्रहणात चंद्राचा पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये प्रवेश (वेध) 4.21 PM. ला होईल. गडद छायेत प्रवेश (स्पर्श) 5.18 PM. ला होईल. संपूर्ण चंद्रबिंब 6.21 PM.ला झाकले जाईल. मात्र आपल्याकडे यावेळी चंद्र क्षितिजा खाली असलेने ग्रहणाची सुरुवात आपण पाहू शकणार नाही. आपणांस खग्रास स्थितीतील चंद्रोदय पाहायला मिळेल. 7.37 PM.ला चंद्राची पूर्वेकडील बाजू दाट छायेतून बाहेर पडताना दिसू लागेल. म्हणजे ग्रहण सुटू लागेल. 8.41 PM.ला पूर्ण चंद्र दाट छायेतून बाहेर पडलेला दिसेल. 9.38 PM.ला विरळ छायेतून चंद्र बाहेर पडेल आणि हा सावल्यांचा खेळ संपेल.

खगोलप्रेमींनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी ग्रहणकाळात आपली निरीक्षणे नोंदवावीत. उदा. एकूण ग्रहणकाळ किती? खग्रास अवस्थेचा काळ किती? खंडग्रास अवस्थेचा काळ किती? सुपरमूनचा आकार मोठा जाणवला का? ब्ल्यू, रेड / ब्लड मून या संकल्पना पटल्या का?

सर्वांनी हा खगोलीय अविष्कार जरूर पहा आणि समाजामध्ये निसर्गाबद्दल , विज्ञानाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी जरूर प्रयत्न करा.

– श्री. शंकर शेलार – लेखन

-© टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे. www.technoexam.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील अधिक नवनवीन माहितीसाठी : WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/X8bvqz या लिंकवर जाऊन रजिस्टर करा
आमचा क्रमांक +91-8657194194 असा सेव्ह आहे का हे तपासून पहा. नसल्यास क्रमांकाच्या आधी +91 जोडा .*.

बुध ग्रह

Posted by editor on
0
Information

बुध ग्रह :

सूर्यापासूनचे अंतर : ५,७९,०९,१७५ कि.मी.
सूर्यापासून क्रमांक (अंतराने) : पहिला
संरचना : (७०% धातू व ३०% सिलिका), ३१.७% पोटॅशियम, २४.९% सोडीयम, ९.५% आण्विक ऑक्सिजन, ७% आरगॉन, ५.९% हेलियम, ५.६% ऑक्सिजन, ५.२% नायट्रोजन, ३.६% कार्बन डायऑक्साईड, ३.४% पाणी, ३.२% हायड्रोजन.
त्रिज्या : २,४३९.७ कि.मी.
व्यास : ४,८७९ कि.मी.
वजन : ३.३०११ × १०^२३ किलोग्रॅम
घनता : ५,४३० कि.ग्रॅ/घनमी. (सूर्यमालेत दुसऱ्या क्रमांकावर)
आकारमान : सर्वात लहान.
अपसूर्य बिंदू : ६,९८,१६,९०० कि.मी. (०.४६६६६९७ खगोलीय एकक)
उपसूर्य बिंदू : ४,६०,०१,२०० कि.मी. (०.३०७४९९ खगोलीय एकक)
परिभ्रमण काळ : ८७.९६९१ दिवस (०.२४०८४६वर्ष)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ : ७.४८ × १०^७ चौरस किमी.
घनफळ : ६.०८३ × १०^१० घन किमी.
पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण : ३.७ मी./से.^२
सरासरी कक्षीय वेग : ४८.८७ कि.मी./से.
पृष्ठभागावरील तापमान : किमान – १९३.१५° से. ते कमाल ४३०.८५° से.
कक्षेचा कल : ७.००५°
आसाचा कल : ०.०१°
पृष्ठभागावरील दाब : अतिशय कमी १ नॅनोपास्कल (१०-१४ बार)
उपग्रह : ० (एकही कृत्रिम उपग्रह नाही)
गाभा: लोहापासून बनला आहे.
पृष्ठभागाचे स्वरूप : खडकाळ (पृथ्वीप्रमाणेच)

© टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे. www.technoexam.com
MPSC च्या लेटेस्ट अपडेट्स साठी आपण टेक्नोएक्झाम चे अधिकृत चॅनेल्स जॉईन करू शकता: WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/aEnjH2 या लिंकवर जाऊन रजिस्टर करा.
आमचा क्रमांक +91-8657194194 असा सेव्ह आहे का हे तपासून पहा. नसल्यास क्रमांकाच्या आधी +91 जोडा